निमगाव केतकीचे श्री केतकेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांची मांदियाळी!
ता.६ निमगाव केतकी. येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, श्री.केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हे पंचक्रोशीतील दर्जा आणि शिस्तीसाठी नावाजलेले विद्यालय आहे येथे नेहमीच आरोग्य शिबिरे,जनजागृती मोहिमा तसेच इतर शालेय व सहशालेय उपक्रम घेतले जातात.
सद्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माध्यमातून शाळेत गटस्तरीय विविध स्पर्धा घेतल्या जात आहेत दि.४ रोजी विद्यालयात खो-खो, चित्रकला,रांगोळी, निबंध, काव्यलेखन अश्या विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा मैदानचे व रांगोळी स्पर्धेचे उदघाट्न मैदानाची पूजा करून व फित कापून करण्यात आले.
![]() |
| क्रीडांगण पूजन करताना विध्यमान उपसरपंच सौ.मनीषा बारवकर. |
![]() |
| रिबन कापून स्पर्धेचे उदघाट्न करताना श्री.अतुल (आप्पा) मिसाळ |
नंतर दि ४ रोजी चे राष्ट्रीय जंत निर्मूलन दिनाचे औचित्य साधून निमगाव केतकी येथील ग्रामीण रुग्णालय यांचेकडून गावातील प्रतिष्ठित शिक्षणप्रेमी नागरिकांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांन जंत निर्मूलनाच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या तसेच आरोग्य कर्मचारी आणि आशा वर्कर्स यांनी विद्यालयात उपस्थित राहून आरोग्याविषयीं मार्गदर्शन केले. यावेळी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री.अतुल (आप्पा) मिसाळ,विद्यमान उपसरपंच सौ. मनीषा सुरेश बारवकर,माजी उपसरपंच सौ. अलकाताई माणिक भोंग, विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य श्री. एम.बी.भोंग सर, पर्यवेक्षक श्री. नाझरकर बी.व्ही. श्री.के.डी. भोंग.सर,श्री.आदलिंग वाय.यु.सर तसेच सा.कार्यकर्ते श्री.गणेश जळक, श्री.सुरेश बारवकर, सर्व शिक्षक वृंद इ.मान्यवर उपस्थित होते. |
![]() |
| आरोग्य व जंत निर्मूलनाविषयीं माहिती सांगताना आरोग्यदूत |
तसेच दिनांक ६ डिसेंबर रोजी विद्यालयात पुणेजिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, सहकार महर्षी कै. मामासाहेब मोहोळ व महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिन व महापरिनिर्वाण दिनानिमित्त या दोन्हीही विभूतींना प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन केले.




Comments
Post a Comment