केतकेश्वर विद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा उत्साहात पार पडली
केतकेश्वर विद्यालयातील शाळा व्यवस्थापन समितीची सहविचार सभा उत्साहात पार पडली.
आज दिनांक 18 रोजी निमगाव केतकी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री केतकेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेज मधील शाळा व्यवस्थापन व विकास समिती ची सहविचार सभा नवनियुक्त प्राचार्य श्री एम बी भोंग सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
आज सकाळी १० वाजता विद्यालयाच्या प्राचार्य कार्यालयात संस्था व शासनाच्या ध्येय धोरणानुसार सदर शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली व समितीच्या सभासदांनी मार्गदर्शन करून सर्वानुमते योग्य ते ठराव मंजूर झाले.
तसेच संस्था आदेशानुसार विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य श्री एम. बी. भोंग सर, उपप्राचार्या सौ मोरे मॅडम व पर्यवेक्षक श्री नाझरकर सर यांचे शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ हार व फेटा बांधून हार्दिक अभिनंदन व सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आणि विद्यालयाचे कामकाज अतिशय उत्कृष्टरित्या चालत असल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी निमगाव केतकीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व चालू वर्षीचे सदस्य श्री अतुल आप्पा मिसाळ तसेच इतर सदस्य व समाजसेवक श्री. भीमराव नाना बोराटे, श्री. अजित फुटाणे, श्री. गणेश दादा जळक, सौ. सपना पवार, सौ. सीमा भगवान, प्राचार्य श्री एम. बी. भोंग सर उपप्राचार्या सौ. मोरे मॅडम, पर्यवेक्षक श्री. नाझरकर सर ज्येष्ठ शिक्षक श्री हेंद्रे सर, शाळा व्यवस्थापन समिती विभाग प्रमुख श्री. आदलिंग सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सदर सभेचे प्रस्ताविक प्राचार्य श्री एम बी भोंग सर यांनी केले, सूत्रसंचालन श्री. हेंद्रे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री आदलिंग सर यांनी केले.


Comments
Post a Comment